JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' 3 नावं आघाडीवर

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' 3 नावं आघाडीवर

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे.

जाहिरात

पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची चर्चा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 7 एप्रिल :  काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे.  या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून ‘या’ उमेदवारांची चर्चा   भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे मविआकडून  कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडून पुणे लोकसभा पटोनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहळ, पुण्याचे माजी खासदार संजय काकडे, यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत होती. मात्र गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात झळकले होते. त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील मागे पडलं आहे. त्यामुळे आता  भाजपकडून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. ‘मविआ’कडून रवींद्र धंगेकर यांचं नाव चर्चेत  दरम्यान दुसरीकडे ‘मविआ’कडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. मोहन जोशी यांचं नाव देखील चर्चेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या