JOIN US
मराठी बातम्या / पुणे / मोठी बातमी! राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; सात्यकी सावरकरांचा मोठा निर्णय, 'ते' वक्तव्य भोवणार?

मोठी बातमी! राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; सात्यकी सावरकरांचा मोठा निर्णय, 'ते' वक्तव्य भोवणार?

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

राहुल गांधींच्या अडचणीत पुन्हा वाढ?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 एप्रिल : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे सेशन कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यापूर्वीच एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांना आपली खासदारकी देखील गमवावी लागली. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केल्यानं राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काय आहे नेमकं प्रकरण? राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सेशन कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सावरकरांवरून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच राहुल गांधी यांना एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे.

यापूर्वीही बदनामीचा खटला दरम्यान यापूर्वी देखील एका बदनामीच्या खटल्यामध्ये राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून गुजरातच्या सुरतमध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयानं राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुला गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांना खासदारकी देखील गमवाली लागली. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या