अजित पवारांचा कट्टर समर्थक एकनाथ शिंदेंच्या गळाला?
पिंपरी चिंचवड, 16 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची आज भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. अण्णा बनसोडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवातच राष्ट्रवादी पक्षातून झाली. अण्णा बनसोडे हे सुरुवातीला पानाची टपरी चालवायचे. मात्र, अजित पवार यांनी त्यांना विधानसभेचे तिकीट देऊन आमदार केले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे एकुलता एक आमदारही फुटला तर राष्ट्रवादीला मोठा फटाका बसू शकतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या भेटीनंतर बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पाडणार राष्ट्रवादीला खिंडार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीनंतर म्हणाले, की राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची आज घेतलेली भेट ही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट आहे. ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बनसोडे यांचे कौतुक करत त्यांना भगवी शाल घालून त्यांचा सत्कार केला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादिचा बालेकिल्ला मानला जातो. अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आमदार बनसोडे यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. मात्र, आजची भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी राजकीय भाष्य करन टाळलं. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत प्रामाणिक मुख्यमंत्री असून ते सर्वांचं काम करतात, मला त्यांचा नेतृत्व आवडत असं म्हणत आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. ही भेट सदिच्छा होती की राजकीय ते येणारा काळच ठरवेल.
वाचा -
अजितदादांची सर्व लवाजमा सोडून छुपी भेट; ‘तो’ कारखाना पुन्हा चर्चेत; भाजप म्हणाले.
. अण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्र्यांची जवळीक वाढली काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि अजित पवार यांचं बिनसल्याचं बोललं जात आहे. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिले जाणार आहे, अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा आता रंगली आहे.