JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Girish Bapat Death : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat Death : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

Girish Bapat Passes Away : काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रीय राजकरणापासून दूर होते.

जाहिरात

भाजप नेते गिरीश बापट यांचं निधन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 मार्च : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रीय राजकरणापासून दूर होते. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी प्रकृती ठीक नसतानाही ते मैदानात उतरले होते. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली होती. गिरीश बापट यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेब ठाकरे, वाजपेयींना जमलं नाही ते सावंत बंधूंनी केलं : आरोग्य मंत्री सावंत गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. गिरीश बापट हे १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली होती. मात्र बापट यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभूत केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या