JOIN US
मराठी बातम्या / पुणे / अमित शाह गिरीश बापटांच्या भेटीला; मुलाने दिली हेल्थ अपडेट

अमित शाह गिरीश बापटांच्या भेटीला; मुलाने दिली हेल्थ अपडेट

गिरीश बापट हे आजारी असताना देखील पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करत असल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता बापट यांच्या मुलानेच त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात

अमित शाह यांनी घेतली गिरीश बापटांची भेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 फेब्रुवारी :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी पुण्यात भाजप नेते गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांचा तब्येतीची चौकशी केली. गिरीश बापट हे आजारी असताना देखील पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करत असल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमित शाह यांच्या भेटीनंतर गिरीश बापट यांच्य मुलाने त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. तसेच अमित शाह आणि बापट यांच्या भेटीमध्ये  नेमकं काय बोलणं झालं याबाबत देखील खुलासा केला आहे. काय म्हणाले गौरव बापट ?  बाबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज अमित शाह आले होते. भेटीदरम्यान दिल्ली सदन येथील गमती-जमती आणि कही  जुन्या आठवणींवर गप्पा झाल्या. कसबा मतदारसंघाबाबत यावेळी कुठलीही चर्चा झाली नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, बाबांची तब्येत अतिशय उत्तम आहे. कोणीही अफांवर विश्वास ठेऊ नका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डॉक्टर सांगतील तसं डायलिसिस करायला जावं लागतं. विकनेसमुळे डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे, मात्र त्यांची तब्येत उत्तर असल्याचं गौरव बापट यांनी म्हटलं आहे. शाहांनी घेतली रासनेंची भेट  कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित शाह यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये हेमंत रासने यांची देखील भेट घेतली. या भेटीमध्ये कसबा पोटनिवडणुकीवर चर्चा झाली. विजयी व्हा तुम्हाला शुभेच्छा देतो असंही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान अमित शाह यांनी आपल्या या पुणे दौऱ्यात जगताप कुटुंब आणि टिळक कुटुंबीयांची देखील भेट घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या