स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट : हे गुप्त ठिकाण उत्तर समुद्रात आहे. या ठिकाणी सिक्रेट व्हॉल्ट आहे. जगातील प्रत्येक वनस्पतीच्या बिया या तिजोरीत आहेत. यामुळे जगात कधी प्रलय घडला तर या बियांच्या मदतीने पुन्हा झाडे उगवली जातील.
रूम 39 : उत्तर कोरियामध्ये प्रवेश करणं खूप कठीण आहे. अशा गूढ देशात एक जागा आहे जी त्याहूनही गुप्त आहे. इथं अनेक बेकायदेशीर कामं होत असल्याचं बोललं जातं. यासोबतच औषधांचं उत्पादनही इथं केलं जातं. किम जोंग उन यांच्या राजवटीतही या गुप्त कक्षाचं योगदान असल्याचं सांगितलं जातं.
एरिया 51: हे ठिकाण नेवाडामधील लास वेगासपासून 83 मैल दूर आहे. त्याला यूएस मिलिटरी बेस म्हणतात. असं म्हटलं जातं की या ठिकाणाहून अमेरिकन सरकार एलियन आणि यूएफओशी संबंधित प्रयोग करतं. हे ठिकाण खूप वादग्रस्त आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे.
मेझगोरये: रशियामधील बाशकोर्तोस्तान प्रजासत्ताकात असलेलं हे शहर बंद आहे. असं म्हणतात की, या ठिकाणी राहणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मोहिमेवर आहे. यासोबतच इथं गुप्त कार्यक्रम चालतात. पण हा कार्यक्रम काय आहे हे कोणालाच माहीत नाही. या ठिकाणी लोकांना प्रवेश बंदी आहे.
स्नेक आयलंड, साओ पाउलो: ब्राझीलच्या या बेटावर सापांच्या अनेक प्रजाती आहेत. इथं 110 एकर जमिनीवर4 हजार सापांचं वास्तव्य आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की इथं सामान्य साप राहतात तर तुम्ही चुकीचे आहात. हे जगातील काही सर्वात विषारी सापांचं घर आहे.
नॉर्थ सेंटिनेल बेट, अंदमान: हे ठिकाण भारतात आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणाची गणना जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांमध्ये केली जाते. इथं राहणारे आदिवासी इथं कोणालाही प्रवेश देत नाहीत. इथं कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी त्याला मारतात.