जगातील सर्वात विषारी गार्डन; इथे श्वास घ्याल तर व्हाल बेशुद्ध
जगभरात अनेक विचित्र गोष्टी आहेत ज्यामुळे लोक थक्क होतात.
या विचित्र गोष्टीपैकी एक म्हणजे विषारी गार्डन याला 'पॉईजन गार्डन' म्हणून ओळखलं जातं.
जगातील विषारी गार्डन म्हणून या पार्कचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलंय.
हे गार्डन इंग्लंडमधील नॉर्थम्बरलॅंड काउंटी येथील अल्नविक येथे आहे.
पॉईजन गार्डनमध्ये100 हून अधिक विषारी वनस्पती आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना झाडांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
येथे अशीही झाडे आहेत ज्यांच्या वासाने माणून बेशुद्ध होऊ शकतो.