जगात श्रीमंतांची कमी नाही. श्रीमंत लोक लाइफस्टाइलवर भरपूर खर्च करतात. तुम्हाला काय वाटतं, त्यांचा दिवसाचा खर्च फार फार तर किती असेल, 2-3 लाख. पण अशी एक श्रीमंत महिला जी दिवसाला तब्बल 70 लाख रुपये खर्च करते. तेसुद्धा एकाच गोष्टीवर.
सौदी नावाची महिला तिचा नवरा जमालचा पैसा आपल्या एका सवयीसाठी उधळते आहे. ती आपल्या लक्झरी लाइफचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सौदीचा जन्म ससेक्समध्ये झाला आहे. तर तिचा नवरा जमाल सौदी अरबमधील आहे. सहा वर्षांची असताना ती दुबईत गेली. तिथंच युनिव्हर्सिटीत तिची जमालसोबत भेट झाला. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत.
सौदीला डिझाइनर कपडे आणि बॅग आवडतात. ब्युटीचा शॉक आहे. तसंच फिरण्यावरही ती किती तरी लाखो रुपये खर्च करते. तिचा नवराही तिला महागडे गिफ्ट्स देतो.
डेली स्टारच्या वृत्तानुसार सौदी म्हणाली, जमालच्या मूडनुसार शॉपिंगमध्ये तर ते दिवसाला 3 लाख ते 70 लाख खर्च करतात. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)