अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेचे 10 वर्षापासूनचे लग्न मोडलं. घटस्फोट झाल्यानंतर ती दुःखी झाली नाही तर तीने आनंद साजरा केला.
मिरर रिपोर्टनुसार, या महिलेने घटस्फोट फोटोशूटदरम्यान आपल्या लग्नाचा ड्रेस जाळला.
लॉरेन ब्रुक असे या महिलेचे नाव असून ती 31 वर्षांची आहे.
ऑक्टोबर 2012 मध्ये तिचे लग्न झाले होते आणि जवळपास 10 वर्षे ती पतीसोबत राहत होती.
सप्टेंबर 2021 मध्ये, पती-पत्नीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोटानंतर ती खूप आनंदी दिसत होती.
लॉरेनची आई फेलिसिया बोमन यांनी तिला मदत केली आणि फोटोशूट देखील केले.
लॉरेन म्हणते की लोक घटस्फोटाला वाईट, वेदनादायक आणि कठीण समजतात, पण ते स्वातंत्र्य आहे. ती तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन पतीसोबत करणार असली तरी आता तिचा त्रास थोडा कमी होणार आहे.
व्यवसायाने बँकर असलेल्या लॉरेनच्या या फोटोशूटमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.