NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / आकाशातील चमचमते तारे अचानक गायब कुठे झाले? समोर आलं सर्वात मोठं कारण

आकाशातील चमचमते तारे अचानक गायब कुठे झाले? समोर आलं सर्वात मोठं कारण

लहानपणी तुमच्यापैकी बहुतेकांनी आकाशात चमकणारे तारे पाहिले असतील. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, की गेल्या इतक्या वर्षात तुम्ही हे दृश्य पाहिले नाही. 

16

आपण आकाशात पाहिलेले तारे कदाचित आपण आपल्या भावी पिढ्यांना दाखवू शकणार नाही. कारण आतापासून आकाशात फारसे तारे दिसत नाहीत. शास्त्रज्ञ म्हणाले, येत्या दोन दशकात तारे पूर्णपणे नाहीसे होतील.

26

द गार्डियनच्या वृत्तानुसार, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ मार्टिन रीस यांनी दावा केला आहे की, प्रकाश प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत तारे कमी दिसू लागले आहेत. त्यांच्या मते एलईडी आणि प्रकाशाच्या इतर स्रोतांच्या वाढत्या वापरामुळे आपले आकाश कृत्रिम प्रकाशाने उजळून निघत आहे. 

36

जर्मन सेंटर फॉर जिओसाइन्सेसचे ख्रिस्तोफर काबा यांच्या मते, आज जर आकाशात 500 तारे दिसतील अशा ठिकाणी मुलाचा जन्म झाला तर आजपासून 18 वर्षांनंतर तेथे केवळ 200 तारे दिसतील. 

46

शास्त्रज्ञांच्या मते, आपण तयार केलेला कृत्रिम प्रकाश म्हणजे प्रकाश प्रदूषण. त्याच्या अतिवापरामुळे रात्रीचा नैसर्गिक प्रकाश मंदावत आहे. चकाकणारे प्रकाश प्रदूषण हे आपण तयार केलेल्या सर्व दिव्यांपैकी सर्वात धोकादायक आहे. यामुळे डोळे विस्फारतात. मग प्रकाश कमी झाला की अंधार जाणवू लागतो. मोठमोठ्या शहरांमध्ये कृत्रिम दिव्यांनी उजळणारे आकाश, अनावश्यक ठिकाणीही अनेक दिवे हे प्रदूषण वाढवतात.

56

संशोधकांचे म्हणणे आहे की जास्त कृत्रिम प्रकाशामुळे आपल्याला नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशातील फरक जाणवू शकत नाही. वर्ल्ड अॅटलस ऑफ आर्टिफिशियल नाईट स्कायच्या अहवालानुसार, जगातील 80 टक्के लोकसंख्या आकाशातील प्रदूषणाने त्रस्त आहे. याचा अर्थ असा की आकाशात अनावश्यकपणे चमकणारा कृत्रिम प्रकाश हे स्कायगोचे कारण आहे. स्कायगोमुळे आता रात्री पूर्वीसारख्या अंधारलेल्या नाहीत.

66

रिपोर्टनुसार, स्कायगोमुळे आता पूर्वीसारखे आकाश ताऱ्यांनी चमकलेले दिसत नाही. इतकेच नाही तर प्रकाश प्रदूषणाबरोबरच आकाशातील ताऱ्यांची कमी दृश्यमानता यामुळे मानवी जीवनावरही वाईट परिणाम होत आहे. एवढेच नव्हे तर चांदण्या रात्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणारे स्थलांतरित पक्षीही भरकटत आहेत. पृथ्वी आणि आकाशासोबतच कृत्रिम दिवे पाण्यावरही परिणाम करत आहेत. त्यामुळे जलचर प्राणीही कमी दिसत आहेत

  • FIRST PUBLISHED :