अनेकजणांना कोल्ड्रिंक प्यायला खूप आवडतं. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कोल्ड्रिंक आवडतं.
कोल्ड्रिंग पिताना तुम्ही एका गोष्ट नोटीस केली का, ती म्हणजे कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये रिकामी जागा का असते? याविषयी आज जाणून घेऊया.
तुम्ही बारीक निरिक्षण केलं असेल तर शीतपेये, पाण्याच्या बाटल्या, बॉडी वॉश, शॅम्पू इत्यादी द्रवपदार्थांनी भरलेल्या सर्व बाटल्या, त्यांचा वरचा भाग रिकामा ठेवला जातो.
सॉफ्ट ड्रिंक कमी तापमानात पॅक केले जातात. त्यानंतर त्यातील काहींना गरजेनुसार उन्हात ठेवल्या जातात. त्यामुळे बाटलीतील तापमान वाढते आणि गॅस बॉटलीतून बाहेर येतो. गॅसचा दबाव जास्त असल्यावर तो प्लॅस्टिकच्या बॉटलला फाडू शकतो. त्यामुळे बाॉटल फाटू नसे म्हणून त्यांच्यावर रिकामी जागा सोडली जाते.
याशिवास पॅकेज देताना ते बाटलीतून सांडू नये म्हणूनही ही जागा सोडली जाते.