एखादी व्यक्ती मृत झाली की तिला अग्नी दिला जातो किंवा दफन केलं जातं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मृतदेहाची राख होते किंवा माती. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक असं ठिकाण जिथं लहान मुलाच्या मृत्यूनंतर त्याचं झाड होतं.
इंडोनेशियाच्या ताना तरोजातील लहान मुलांच्या मृत्यूनंतरचं हे अजब रहस्य आहे. याच्यामागील कारण इथं असलेली एक अजब परंपरा किंवा प्रथा.
इथं एखाद्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला की सामान्य अंत्यसंस्कार केले जातात पण लहान मुलाच्या मृत्यूचा संबंध निसर्गाशी जोडला जातो.
त्यामुळे लहान मुलाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह झाडाच्या मुळाशी दफन केला जातो. हळूहळू तो या झाडाचाच भाग बनतो.
असं केल्याने जग सोडून गेलेलं लहान मूल झाडाच्या रूपाने कायम तिथं राहतो, अशी या लोकांची भावना आहे. देवाने दूर केलं तरी मूल पालकांपासून दूर जात नाही. त्या मुलाचे पालक झाडालाच आपलं मूल मानू लागतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)