NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / भन्नाट नोकरी! बस्सं, फक्त दारू प्यायचं आणि फिरायचं; कुठे आहे पटापट क्लिक करून पाहा

भन्नाट नोकरी! बस्सं, फक्त दारू प्यायचं आणि फिरायचं; कुठे आहे पटापट क्लिक करून पाहा

जगातील ही अशी पहिलीच नोकरी असल्याचं सांगितलं जातं आहे.

18

फिरायला तर अनेकांना आवडतं आणि काही लोक तर दारूचे शौकिन. पण यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण तुम्हाला यासाठी कुणी पैसे दिले तर... साहजिकच आश्चर्याचा धक्का बसेल.

28

एका कंपनीने अशी अजब नोकरी ऑफर केली आहे. ज्यात कर्मचाऱ्याला फिरण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी पगार दिला जाणार आहे. फिरण्याची आणि दारू पिण्याची हौस असलेल्यांसाठी ही जबरदस्त नोकरी आहे.

38

हा पिंट चेझर जॉब आहे. ज्यात  कर्मचार्‍याला मोटरव्हॅनसह फिरावं लागेल आणि बिअरचा आस्वाद घ्यावा लागेल. ज्या कंपनीने ही नोकरी ऑफर केली आहे, तिचे पब, वाईनरी आणि द्राक्ष बागांसह सुमारे 1100 छोटे व्यवसाय आहेत. यासाठी त्यांना पिंट चेझर आवश्यक आहे.

48

जगातील अशा प्रकारची ही पहिलीच नोकरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वतः मोटारव्हॅन किंवा कॅम्परव्हॅन चालवावी लागेल. कर्मचाऱ्याला यासाठी एक सुसज्ज मोटरहोम दिलं जाईल.

58

या नोकरीत तुम्हाला शेकडो सुंदर आणि आल्हाददायक ठिकाणे बघायला मिळतील आणि चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्थाही होईल. तुम्हाला कॅम्पिंग आणि चांगल्या दर्जाची बिअर पिण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत, उलट पैसे मिळतील.

68

पिंट चेझरला एका ठिकाणी फक्त एक रात्र राहावं लागेल. तुम्ही दारूच्या नशेत तर नाही ना याची तपासणी केल्यावर तुम्हाला तेथून निघावं लागेल.

78

प्रत्येक दिवसाच्या सहलीसाठी स्टायपेंड म्हणून पैसे मिळतील. याशिवाय ब्रिट स्टॉपचे आजीवन सदस्यत्वही दिलं जाणार आहे. या कामासाठी वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं.

88

आता ही नोकरी आहे कुठे तर, यूकेत. ब्रिट स्टॉपने ऑफर केलेली ही नोकरी. युनायटेड किंगडमच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला फिरायचं आहे.

  • FIRST PUBLISHED :