घर कितीही स्वच्छ ठेवलं, कितीही साफसफाई केली तरी कोळ्यांची घरं म्हणजे कोळ्यांची जाळी होतातच. कोळी आणि कोळ्याची जाळी पाहिली की घाण वाटते. पण असं ठिकाण जिथं चक्क कोळी खाल्ला जातो.
आता असं विचित्र खाण्याच्या बाबतीत सर्वात आधी कोणता देश समोर येईल, तर तो साहजिकच चीन. इथं लोकांचा भाजलेला किंवा तळलेला कोळी आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे. चिली सॉसबरोबर स्टिकमध्ये अडकवून हे खाल्ले जातात.
चीननंतर आणखी कुठे कोळी खाल्ला जातो तर तो कंबोडियात. इथं टॅरंटुला हा कोळी तळून खातात.
1970 च्या दशकात पोल पॉट नावाचा हुकूमशहा कंबोडियात होता, तो तिथला पंतप्रधानही झाला. त्याच्या काळात खाण्यापिण्याची एवढी टंचाई होती की लोक जे खायला मिळेल ते खात असत.
फक्त याच कारणासाठी तेथील लोक कोळी तळून खाऊ लागले आणि आजही काही लोक ते खातात.