NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / मुलासाठी काहीही, बापाने चक्क भंगारातून बनवली भन्नाट इलेक्ट्रिक बाईक, PHOTOS

मुलासाठी काहीही, बापाने चक्क भंगारातून बनवली भन्नाट इलेक्ट्रिक बाईक, PHOTOS

वाशिमच्या कारंजा शहरातील इलेक्टरीशीयन असलेल्या रहीम खान यांनी आपला मुलगा शाफिन खान यासाठी भंगार साहित्यातून भन्नाट इ बाईक बनविली आहे. (किशोर गोमाशे, प्रतिनिधी)

17

27

कारंजा शहरातील रहीम खान यांचा धाकटा मुलगा शाफिन खान हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. त्याचे मित्र मात्र महागड्या वेगवेगळ्या कंपनीच्या बाईकने कॉलेजला येत असत. हीच बाब त्याच्या मनात घर करून गेली आणि त्याने आपल्या वडिलांकडे बाईक घेऊन देण्याचा हट्ट धरला.

37

मात्र इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या आणि घरी छोटसं वेफर्सचे दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहीम खान यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांच्याकडे मुलाला एखाद्या कंपनीची बाईक घेऊन देण्या एव्हढे पैसे नव्हते. त्यांना ही बाब सलत होती तेव्हा त्यांनी स्वतःच बाईक बनवून देण्याचा निश्चय केला.

47

मुलांचं बाईकचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रहमान खान यांनी भंगार साहित्याच्या दुकानातून बाईकसाठी लागणारे हँडल, शॉकअब्स, टायर यासह इतर साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केलं नंतर एक 24 व्होल्ट बॅटरी अन 24 व्होल्ट मोटार घेतली व घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडी वर ती बसविली. स्वतः इलेक्टरीशीयन असल्याने त्यांनी सर्व सर्किट व्यवस्थित जोडून भंगार साहित्यापासून ई बाईक तयार केली.

57

तिला स्पीडमीटर, हेडलाईट, साईड इंडिकेटर जोडून कलरिंगही केली. भंगार साहित्यापासून ही बाईक बनविण्यासाठी रहीमखान यांना दोन महिन्याचा कालावधी लागला असून जवळपास 18 ते 19 हजार रुपये खर्च आलाय.आता ही बाईक 50 ते 60 किलो वजन घेऊन 15 ते 20 किलो मीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावत असून शाफिन खान दररोज या भन्नाट इ बाईक वरून कॉलेजला जातोय.

67

माझ्या वडिलांनी बनविलेली ही इ बाईक इतकी मस्त आहे की लाखो रुपयांच्या बाईक असलेल्या माझ्या मित्रांनाही माझ्या या इ बाईक ची राईड घेण्याचा मोह आवरत नाही. माझ्या वडिलांनी अत्यल्प खर्चात बनविलेली ही इ बाईक सरस ठरत असुन माझं बाईक वरुन कॉलेज ला जाण्याचं स्वप्न ही पूर्ण झालं आहे.

77

रहीम खान यांनी बनविलेल्या या इ बाईकला जर जास्त क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली तर हिची क्षमता आणि वेगही वाढवता येऊन उच्च दर्जाची इ बाईक बनवून ती सामान्यांना परवडेल अशा किंमतीत तयार होईल ज्यामुळं शाफिन खान सारख्या अनेकांचं बाईक चं स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत मिळेल.त्यासाठी रहीम खान यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे.

  • FIRST PUBLISHED :