NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / अजब डिव्होर्सची गजब कहाणी! ही मॉडेल स्वत:लाच देणार घटस्फोट, पुरुषांना कंटाळून स्वत:शी केलं होतं लग्न

अजब डिव्होर्सची गजब कहाणी! ही मॉडेल स्वत:लाच देणार घटस्फोट, पुरुषांना कंटाळून स्वत:शी केलं होतं लग्न

Weird News : ब्राझीलमधील प्रसिद्ध मॉडेट ख्रिस गॅलेरा (Brazil Model Chris Galera)सध्या चर्चेत आहे. ख्रिसने सांगितले होते की, तिचा पुरुषांवरील विश्वास उडाला आहे आणि आता तिला स्वतःसोबत आयुष्य घालवायचे आहे. तिने सप्टेंबरमध्ये स्वतःशी लग्न देखील केले (Brazilian model Married Herself) पण आता तिला या नात्यातून मुक्त व्हायचे आहे. आता ती स्वतःशी घटस्फोट घेणार आहे कारण तिच्या आयुष्यात कोणीतरी प्रवेश केला आहे.

16

अनेकवेळा जेव्हा आपल्या मनाप्रमाणे नाती जुळत नाहीत तेव्हा आपली निराशा होते. असेच काहीसे या ब्राझिलियन मॉडेलसोबत घडले. ती पुरुषांना कंटाळली होती आणि एकटी राहत होती. तेव्हा तिला जाणवले की ती एकटीच इतकी सक्षम आहे की तिला कोणाचीही गरज नाही तेव्हा तिने स्वत:शी लग्न केले. या मॉडेलचं नाव आहे ख्रिस गॅलेरा. मात्र तिचं हे नात देखील तीनच महिने टिकलं.

26

ब्राझीलच्या साओ पाओलो (Sao Paolo) मधील प्रसिद्ध मॉडेट ख्रिस गॅलेरा (Brazil Model Chris Galera)सध्या चर्चेत आहे. ख्रिसने सांगितले होते की, तिचा पुरुषांवरील विश्वास उडाला आहे आणि आता तिला स्वतःसोबत आयुष्य घालवायचे आहे. तिने सप्टेंबरमध्ये स्वतःशी लग्न देखील केले (Brazilian model Married Herself) पण आता तिला या नात्यातून मुक्त व्हायचे आहे. आता ती स्वतःशी घटस्फोट घेणार आहे कारण तिच्या आयुष्यात कोणीतरी प्रवेश केला आहे. तिने लग्न अगदी रीतींनुसार केलं होतं, त्यामुळे तिला घटस्फोट घेऊनच पुढील नात्यात जायचं आहे.

36

प्रियकरांनी फसवल्यानंतर तिने स्वतःला सावरलं आणि ठरवलं की ती स्वतःशीच लग्न करेल कारण तिला इतर कोणाची गरज नाही. ख्रिसने वधूसारखे कपडे घातले आणि चर्चमध्ये स्वतःशी लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

46

ख्रिसचे बोल्ड फोटो देखील नेहमी व्हायरल होत असतात. मिररच्या रिपोर्टनुसार, तिला आता या लग्नातून बाहेर पडायचे आहे कारण तिला तिच्या आयुष्यातील प्रेम सापडले आहे आणि तिला पुन्हा लग्न करायचे आहे

56

ख्रिसच्या मते, तिचा प्रेमावरील विश्वास उडाला होता, मात्र या व्यक्तीच्या प्रवेशानंतर तिचा पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास बसू लागला आहे.

66

तिला एका अरब व्यक्तीने लग्नासाठी मागणी देखील घातली होती. ज्यात या अरब शेखने तिला 3 कोटींपेक्षा जास्त रक्कमही देऊ केली होती. त्यावेळी तिने त्याला नकार देत म्हटले होते की ती लग्न फक्त पैशांसाठी करत नाही आहे.

  • FIRST PUBLISHED :