जगातील आणि आंतराळातील विविध गोष्टींचा शोध शास्त्रज्ज्ञ घेत असतात. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं समोर आलंय.
शास्त्रज्ज्ञांनी प्रथमच विश्वात, ब्रम्हाडांत घुमत असलेल्या आवाजाचा शोध लावला आहे. त्यांनी गुरुत्वीय लहरींचा आवाज ऐकला आहे.
जगभरातील खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाने गुरुत्वीय लहरींचा आवाज शोधला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये सात भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे.
या लहरींचा आवाज शोधण्यासाठी 6 लो-पिच जागतिक रेडिओ दुर्बिणी वापरल्या.
शास्त्रज्ञांचा हा शोध गेल्या महिन्यात द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाला होता. 190 शास्त्रज्ज्ञांची टीम गेल्या 15 वर्षापासून गुरुत्वीय लहरींचा शोध घेत होती.
कृष्णविवर जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा गुरुत्वाकर्षण लहरी निघतात. म्हणजेच आपण समजू शकता की गुरुत्वीय लहरी कोणत्याही वस्तूच्या फिरण्याने निर्माण होतात.