उत्तर कोरियाचे (North Korea) तानशाह किम जोंग उन (Kim Jong-un) यांची नेहमी चर्चा असते. पण सध्या जगभरात एका वेगळ्याच किमची चर्चा आहे, ज्याने जगभरात संपूर्ण मीडियाचं लक्ष केंद्रीत केलं आहे. (फोटो क्रेडिट- Pipa Piegon Paradise)
किम हा दोन वर्षांचा रेसिंग कबूतर आहे, ज्याची ऑनलाईन लिलावात 19 लाख डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांत विक्री झाली आहे. या लिलावामुळे जगातील सर्वात महागडा कबूतर होण्याचा लौकिकही त्याने मिळवला आहे. (फोटो क्रेडिट- Pipa Piegon Paradise)
एका ऑनलाईन लिलाव करणाऱ्या पॅराडाईजने (पीपा) एका अज्ञात चीनी नागरिकाने रविवारी न्यू किम नावाचा फिमेल होमिंग कबूतर 1.6 मिलियन यूरो (1.9 मिलियन डॉलर) मध्ये खरेदी केला. (फोटो क्रेडिट- Pipa Piegon Paradise)
पॅराडाईजनुसार, गेल्या वर्षी नर आर्मंडो कबूतर 1.25 मिलियन यूरोमध्ये खरेदी केला गेला होता. पण न्यू किमने आर्मंडोला मागे टाकत, नवा रेकॉर्ड केला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
पॅराडाईजचे अध्यक्ष निकोलास गिसेलब्रेक्टने सांगितलं की, हा एक जागतिक रेकॉर्ड आहे. अशाप्रकारे अद्याप कोणताही लिलाव झालेला नव्हता. (प्रतिकात्मक फोटो)