देशात खूप सारे चहाप्रेमी आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही चहापासून होतो.
'चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा हवाच' ही म्हण चहाप्रेमींसाठी ब्रीद वाक्यच आहे. त्यामुळे चहाप्रेमी कोणत्याही वेळेला चहा घेऊ शकतात.
केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही चहाप्रेमींची कमतरता नाही.
भारतापेक्षाही दुसऱ्या देशात चहाचे अधिक सेवन केले जाते.
स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, तुर्की लोक चहा पिण्याच्या बाबतीत जगात पुढे आहेत.
तुर्की येथे 10 पैकी नऊ म्हणजे 90 टक्के लोक चहा पितात.
चहाप्रेमी देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. 72 टक्के भारतीय चहाचा आस्वाद घेतात.
केनिया हा चहाचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहे, देशातील 83 टक्के लोक नियमितपणे चहा पितात.