या फोटोंमध्ये जुन्या काळात मजूर यमुना नदीच्या काठावर काम करताना पाहायला मिळत आहेत. या फोटोतून ताजमहालच्या बांधकामाचे विविध टप्पे पाहायला मिळत आहे.
भूतकाळातील एक झलक! या कॅप्शनसह ज्यो जॉन मुल्लूर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत. शाहजहानचा अविश्वसनीय वारसा ताजमहाल, त्याच्या बांधकामादरम्यान दुर्मिळ छायाचित्रांमध्ये टिपला गेला आहे. बादशहाचे अनुमतीपत्र देखील यात देण्यात आले आहे.
हे फोटो मिडजर्नी एआयने तयार केले आहेत. जॉन मुल्लूरच्या सर्जनशीलतेने सोशल मीडिया युजर्स अचंबित झाले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'तुमची कल्पनाशक्ती दाखवण्यासाठी सुंदर निवड.' दुसर्याने लिहिले, 'आवडलं! आणि पत्र.... काय कल्पना आहे! तुम्ही सगळ्यांना जिवंत करत आहात. एका व्यक्तीने लिहिले, 'खरा कलाकार'
मिडजर्नी AI ने तयार केलेला कृष्णधवल फोटो ताजमहालचा मध्यभागाचा आहे. त्याच्या सभोवतालचे खांब बांधकामाधीन आहेत. जॉन मुल्लूर यांनी आश्चर्यकारक फोटोंच्या सेटद्वारे स्मारकाच्या बांधकामाच्या त्यांच्या कल्पनाशक्तीला मूर्त रुप दिलं आहे.
जॉन मुल्लूरने बादशहा शाहजहानने बांधलेल्या प्रेमाच्या प्रतीकाला सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत असे मूर्त रूप दिले आहे. हे फोटो पाहून कोणालाही वाटणार नाही की हे सर्व फोटो एआयने तयार केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही बांधकामाचे काम समोरून पाहत असल्याचा भास होईल.
मुल्लूरने ताजमहालच्या बांधकामापूर्वी गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे सेल्फी शेअर केले होते. सध्या त्याने एआयवर तयार केलेली अनेक छायाचित्रे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
ताजमहालच्या बांधकामाचा टप्पे दाखवल्यानंतर मुल्लूरने शाहजहानने त्याच्या नावाने लिहिलेले पत्र शेअर केले. त्यात ताजमहालशी संबंधित सर्व माहिती आहे, जसे की बांधकाम कधी पूर्ण झाले, किती मजूर कामावर होते, त्याचे वास्तुविशारद कोण होते आणि 2020 नुसार, भारतीय रुपया आणि यूएस डॉलर दोन्हीमध्ये किती पैसे खर्च झाले. आणि सरतेशेवटी, बादशहाने मुल्लूरला हे फोटो शेअर करण्याची परवानगीही दिली.