NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / एका सापाची एंट्री अन् 16000 घरात एकाच वेळी असं काही घडलं की सर्वांची झोप उडाली

एका सापाची एंट्री अन् 16000 घरात एकाच वेळी असं काही घडलं की सर्वांची झोप उडाली

एकट्या सापाने एकाचवेळी 16000 घरात असं काही केलं की तुमचाही विश्वास बसणार नाही.

16

घरात साप घुसला, घराच्या एखाद्या कोपऱ्यात साप सापडला अशी किती तरी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण तरी एखादा साप एका वेळी एकावरच भारी पडू शकतो.

26

तुम्हाला आश्चर्य वाटेल एकट्या सापाने 16000 घरांतील लोकांच्या घरात एकाच वेळी असं काही केलं आहे की सर्वांची झोप उडाली आहे. अमेरिकेतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

36

ऑस्टिन शहरात एका सबस्टेशनमध्ये साप घुसला, तो इलेक्ट्रीफाईड सर्किटच्या संपर्कात आला, ज्यामुळे विजेचा प्रवाह थांबला. यामुळे तब्बल 16 हजार घरांमधील वीज खंडित झाली.

46

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 16 मे रोजी दुपारी 1 वाजता आउटेज सुरू झाला आणि सुमारे 16,000 ग्राहक प्रभावित झाले. सापामुळे हजारो लोकांच्या घरातील बत्ती गुल झाली.

56

ऑस्टिन एनर्जीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की वन्यजीवांच्या हस्तक्षेपामुळे वीज निकामी होऊ शकते. आज एक साप आमच्या एका सबस्टेशनवर विद्युत सर्किटच्या संपर्कात आल्यामुळे विजेचा प्रवाह थांबला.  दु. 2 वाजेपर्यंत वीज पूर्ववत करण्यात आली.

66

ऑस्टिन एनर्जीचे प्रवक्ते मॅट मिशेल म्हणाले की, कंपनी आता अशा प्राण्यांना विजेपासून दूर ठेवण्यासाठी सबस्टेशनभोवती लो-व्होल्टेज इलेक्ट्रिक स्नेक फेन्सिंग बसवण्याच्या प्रक्रियेत आहे.(सर्व फोटो - प्रतीकात्मक)

  • FIRST PUBLISHED :