कचऱ्याचे फोटो-व्हिडीओ पाठवण्यासाठी चक्क सरकार नागरिकांना पैसे देत आहे. सरकारने ही अनोखी अशी योजना सुरू केली आहे.
नागरिकांनी त्यांना कचरा दिसताच त्याचा फोटो, व्हिडीओ काढायचा आणि तो सरकारला पाठवायचा आहे.
सार्वजनिक ठिकाणे, खाजगी मालमत्ता आणि जलकुंभांमध्ये घन आणि द्रव कचरा टाकल्यास त्याची तक्रार करण्याची सूचना सरकारने केली आहे.
व्हॉट्सअॅप नंबर आणि ई-मेलवर हे फोटो-व्हिडीओ पाठवायचे आहेत. माहिती देणाऱ्याचं नाव किंवा तपशील सार्वजनिक केले जाणार नाहीत.
अशी कचऱ्याची तक्रार करणाऱ्याला बक्षीस दिलं जाणार आहे. प्रत्येक तक्रारीसाठी 2,500 रुपये रक्कम दिले जातील.
राज्याला कचरामुक्त करण्यासाठी केरळ सरकारने ही योजना लागू केली आहे. 'मालन्य मुक्तम नवा केरलम्' मोहिमेचा हा एक भाग आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)