प्राणी-पक्षी आणि इतक जीवांमध्येही विविधता असते. म्हणजे एका जीवाच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात. त्यांच्यामध्ये काही ना काही फरक असतो. अशाच एका प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गुलाबी गुलाबी रंगाचा हा प्राणी. शरीराने अवाढव्य असा. जो एका टेम्पोमधून उतरताना दिसतो आहे. या प्राण्याला मोठी शिंगही आहेत. तब्बल दोन फुटांची ही शिंगं असतील. शिवाय त्याची शरीरयष्टी एखाद्या गेंड्यासारखी आहे.
आता असा प्राणी तुम्ही कधी पाहिला आहे का? @Terrifyingnatur ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा लाल रंगाचा रेडा आहे. तुम्ही असा लाल रेडा कधी पाहिला आहे का? असा सवाल या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.
तुम्ही असा प्राणी पाहिला असाल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. (सर्व फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)