काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी जुन्या दिल्लीतील मटिया महल मार्केटला भेट दिली.
यावेळीचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रमजान महिन्याच्या उत्साही वातावरणात दिल्लीच्या कनॉट प्लेसजवळील बंगाली मार्केट आणि चांदनी चौक परिसरात त्यांनी भेट दिली.
राहुल गांधी यांनी याठिकाणी काही लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेतला.
बंगाली मार्केटमध्ये, राहुल गांधींनी पाणीपुरीवर ताव मारला.
दिल्लीतील मोहब्बत का शरबत या दुकानात कलिंगडदेखील खाल्ले.
राहुल गांधींना पाहण्यासाठी शेकडो लोकांनी चांदणी चौकातील रस्त्यावर गर्दी केली होती.
जामा मशिदीसमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसोबत राहुल गांधींनी सेल्फीही घेतला.