NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / आश्चर्य! डिलीव्हरीच्या 6 महिन्यांनी महिला पुन्हा प्रेग्नंट आणि जन्माला आले MoMo Babies

आश्चर्य! डिलीव्हरीच्या 6 महिन्यांनी महिला पुन्हा प्रेग्नंट आणि जन्माला आले MoMo Babies

पहिल्या डिलीव्हरीनंतर सहा महिन्यांत महिला पुन्हा ट्विन्ससह प्रेग्नंट झाली पण तिच्या पोटातील जुळी सामान्य नव्हती.

19

जुळी, तिळी, चार आणि पाच बाळही जन्माला आल्याचं तुम्हाला माहिती असेल. पण कधी मोमो बेबीबाबत ऐकलं आहे का? एका महिलेने अशा बाळांना जन्म दिला आहे.

29

यूएसच्या अल्बामामध्ये राहणारे ब्रिटनी आणि फ्रँकी अल्बा या दोघांचं कुटुंब दोन वर्षांतच सहा जणांचं झालं आहे. तिने दोनदा ट्विन्सना जन्म दिला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

39

ब्रिटनीने आधी आयडंटिकल ट्विन्सना जन्म दिला होता. डिलीव्हरीच्या सहा महिन्यांनंतर ती पुन्हा प्रेग्नंट असल्याचं तिला समजलं.

49

वैद्यकीय तपासणीत तिला पुन्हा ट्विन्स होणार असल्याचं निदान झालं. पण ते ट्विन्स सामान्य नव्हते तर मोमो ट्विन्स होते.

59

माहितीनुसार यूएसमध्ये या दुर्मिळ प्रेग्न्सीचं प्रकरण 35,000 ते 60,000 मध्ये एकच असतं. 

69

मोमो ट्विन्सच्या प्रेग्नन्सीत धोकाही खूप असतो. गर्भपात, मृत बाळ जन्माला येणार, जन्मदोष असे धोके आणि गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

79

ब्रिटनीने रुग्णालयात 50 दिवस घालवले. तिची सिझेरियन डिलीव्हरी झाली. जन्मानंतर बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं.

89

आता मोमो ट्विन्स म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यांना मोनो मोनो किंवा मोनोअॅमनायोटि-मोनोक्रोयानिक ट्विन्स असंही म्हणतात. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

99

मोमो बेबी किंवा मोमो ट्विन्स म्हणजे असे जुळे बाळ जे आईच्या गर्भात एकच अॅम्नायोटिक सॅक आणि प्लेसेंटा शेअर करतात.

  • FIRST PUBLISHED :