NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / अशी दिसत होती जगातील पहिली प्रेग्नंट 'ममी'; 2 हजार वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू

अशी दिसत होती जगातील पहिली प्रेग्नंट 'ममी'; 2 हजार वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू

शास्त्रज्ञांनी सापडलेल्या प्रेग्नंट ममीचा चेहरा तयार केला आहे.

17

1826 साली शास्त्रज्ञांना इजिप्तमध्ये एक प्रेग्नंट ममी सापडली. त्यानंतर तिला इजिप्तहून पोलंडच्या वारसॉमध्ये नेण्यात आलं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)

27

या ममीला द मिस्ट्री लेडी असं म्हणण्यात आलं. या महिलेचा मृत्यू दोन हजार वर्षांपूर्वी झाला होता.

37

तिचा अभ्यास करण्यात आला तेव्हा तिच्या पोटात भ्रूण असल्याचं दिसलं. गरोदरपणाच्या 28 व्या आठवड्यात तिचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचं वय 20 ते 30 वर्षे होतं, असं मानलं जातं आहे.

47

फॉरेन्सिक शास्त्रज्ञांनी 2डी आणि 3डी तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील या पहिल्या प्रेग्नंट ममीचा चेहरा समोर आणला आहे.

57

तिची कवटी आणि शरीराच्या इतर भागाचा उपयोग करून तिचा हा चेहरा तयार करण्यात आला आहे.

67

फॉरेन्सिक शास्त्रज्ञ आणि वारसॉ ममी प्रोजेक्टचे सदस्य चँटल मिलानी म्हणाले, आपली हाडं आणि कवटी, मुख्यतः कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याबाबत खूप माहिती देतात.

77

पण ही महिला अशीच दिसत असावी, हे आपण ठोसपणे सांगू शकत नाही, असंही मिलानी यांनी स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य - Warsaw Mummy Project Human/facebook)

  • FIRST PUBLISHED :