सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केलं जातं. यावेळी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न फोटोग्राफर्स आणि कपलचा असतो. असंच हे प्री-वेडिंग शूट आहे. जे तुफान व्हायरल होतं आहे.
प्री-वेडिंगमध्ये शक्यतो कपलची लव्ह स्टोरी दाखवली जाते. पण या प्री-वेडिंगमध्ये तुम्हाला नवरा-नवरीशिवाय सापही दिसेल. यात नवरा-नवरी सापासोबत पोझ देताना दिसत आहेत.
तरुणी एका ठिकाणाहून जात असले तिथं तिला एक साप दिसतो आणि ती त्याला बघून घाबरते.
त्यानंतर ती फोन करून सर्पमित्रांना बोलावते.
काही वेळातच सर्पमित्र तिथं येतो आणि सापाला पकडतो.
त्यानंतर तरुणी आणि सर्पमित्र एकमेकांच्या प्रेमात पडतात.
जाता जाता सर्पमित्र तरुणीला फोन करण्याचं इशारा करतो.
तरुणी सर्पमित्राला फोन करते आणि त्यांच्यात बोलणं सुरू होतं. नंतर दोघंही एकमेकांना भेटू लागतात.
शेवटी दोघंही एकत्र जाताना आणि त्यांच्या मागे साप दिसतो. ही लव्ह स्टोरी पाहिल्यानंतर युझर्सनी नागराजने बना दी जोडी असं म्हटलं आहे.
विवेक नावाच्या ट्विटर युझरने प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यात संपूर्ण लव्ह स्टोरी सांगण्यात आली आहे.