दिवसेंदिवस रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढलं आहे.
अपघातामुळे अनेकांचा जीव जात असून प्रत्येकाला हेल्मेट घालण्यासाठी सांगितलं आहे.
वारंवार हेल्मेट घालण्याची सक्ती देऊनही अनेकजण याचं पालन करत नाही.
हेल्मेट न घालणाऱ्यांसाठी पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
हेल्मेट जनजागृती करण्यासाठी श्वानालाही हेल्मेट घालून गाडीवर फिरवलं.
वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकाना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती सुरू केलीय.
त्यांचे फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.
या हटके आयडियाचा वापर करत वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी पुन्हा एकदा हेल्मेट घालण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.