अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ आलं आहे.
सोशल मीडियावर नेटिझन्सनी बरेच मीम्स शेअर केले आहेत. राजकीय भूकंपाबद्दल सोशल मीडियावर मजेशीर चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 4 वर्षांपूर्वीचा पहाटेचा शपथविधी, आताच्या शपथविधीनंतर पुन्हा व्हायरल होतो आहे.
गेले काही दिवस राजकारणात भाकरी चर्चेत होती. ही भाकरी साहेबांनी फिरवताच आता दादा पिठाचा डबा घेऊन गेले, असं म्हटलं जातं आहे.
पक्षातून एकएक गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा असा फोटो करून त्यावर सर्व निघून जाणार फक्त उद्धव ठाकरे राहणार, असं लिहिण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला हा डायलॉग, ज्याला आताच्या राजकीय परिस्थितीचा टच देण्यात आला आहे.
अजित पवार यांची प्रतिक्रिया कशी असेल, याचा अंदाज लोकांनी असा बांधला.
असे किती तरी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्हालाही असे काही मीम्स सापडले असतील, तर सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. (सर्व फोटो - सोशल मीडिया)