बनासकाठा जिल्ह्यातून कांकरेजच्या टोटाना गावात गोविंदभाई बजानिया आपल्या परिवाराचे पालणपोषण करण्यासाठी मजूरी करतात. गोविंदभाई बजानिया यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत एक मंदिर बनवले आहे. तसेच ते सकाळ-संध्याकाळ मंदिरात जाऊन आपल्या पत्नीसोबत घालवलेल्या क्षणांना आठवतात.
गोविंदभाई मानाभाई बजानिया हे बनासकाठा जिल्ह्यातील कांकरेज तालुक्याच्या टोटाना गावात राहतात. तिसरीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. गोविंदभाई यांनी 2009 मध्ये वर्षाबेन सोबत लग्न केले होते.
लग्नानंतर ते आपल्या पत्नीसोबत आनंदात राहत होते. मात्र, वर्षाबेनला बालपणापासून वाल्वुअरचा आजार होता. 2018मध्ये त्यांची तब्येत अचानक बिघडली.
त्यामुळे त्यांना उपचारासाठी पाच ते सहा वेळा अहमदाबाद येथे घेऊन जाण्यात आले. मात्र, अधिक तब्येत खराब झाल्याने त्या कोमामध्ये गेल्या. यादरम्यान, गोविंद यांनी आपला कामधंदा सोडून ते आपल्या पत्नीची सेवेत लागले होते. मात्र, 2019 मध्ये गोविंदभाई यांची पत्नी वर्षाबेन यांचे निधन झाले. व्यक्ती मेल्यानंतर त्यांच्या समाजात दफनविधी करतात. त्यामुळे गोविंदभाई यांची पत्नीचा दफनविधी करण्यात आला.
यानंतर गोविंदभाई आणि त्यांचा मुलगा वर्षाबेनच्या समाधीवर त्यांची आठवण करायचे. तीन वर्षांपर्यंत हे असंच चाललं. यानंतर त्यांचा एक मित्र दिनेशभाई वाघेला यांनी समाधीस्थळावर एक मंदिर बनवले होते.
गोविंदभाई प्रत्येक दिवशी मंदिरात दिवा लावायला आणि आपल्या पत्नीच्या आठवणीत तिथे जात होते. काही वेळेनंतर गोविंदभाईला गाव आणि समाजातील काही लोकांनी दुसरे लग्न करण्यासाठी मनवले. यानंतर गोविंदभाई यांनी भावनाबेन यांच्यासोबत दुसरे लग्न केले.
गोविंदभाई आणि त्यांची दुसरी पत्नी या मंदिराची देखभाल करतात. तसेच सकाळ आणि संध्याकाळी त्याठिकाणी जाऊन दिवा लागतात. या मंदिरावर गावातील लोकंही दर्शनासाठी येतात. तसेच आपली इच्छा व्यक्त करतात. लोकांचा विश्वास आहे की, इथे व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते.