उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात लग्नाचे वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. तुम्हाला या लग्नाची गोष्ट ऐकून खरचं आश्चर्य वाटेल. अवघ्या काही मिनीटांत झालेल्या या लग्नामुळे सगळेच चकीत झाले आहेत. गावातील एका मध्यमवयीन व्यक्तीचे लग्न होत नसल्याने त्याने तेट तृतीयपंथीयाशी लग्न केलं आहे. या सगळ्याला त्या व्यक्तीच्या मित्रांनी त्याला मदत केली आहे. एकाने मंत्र तर एकाने व्हिडीओ केला आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तरप्रदेशच्या टोला खंगरण गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या गावातील एका मध्यमवयीन व्यक्तीने तृतीयपंथीयासोबत लग्न केले आहे. त्याच्या मित्रांनी त्याला मदत करत एकजण पुजारी झाला तर एकजण व्हिडीओ करत होता. यानंतर संध्याकाळी त्यांनी जेवणाचा बेत केला होता तर वरातीचेही नियोजन करण्यात आलं होतं. यामुळे या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती.
टोला खंगरण गावातील रहिवासी नथुराम सिंह यांना दोन मुलं आहेत, त्यापैकी मोठ्या मुलाचे लग्न झाले आहे, तर 48 वर्षीय धाकटा मुलगा छत्रपाल सिंग अविवाहित होता. छत्रपालने लग्नासाठी खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. कंटाळलेल्या छत्रपालने गावातील सती माता मंदिराजवळील तृतीयपंथी बिल्लो राणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला त्याच्या मित्रांनी साथ देत त्याला मदत केली. आणि मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नात त्यांनी सात फेरे घेताना घरात असलेल्या मातीच्या खांबाला प्रदक्षिणा घेतली. या अनोख्या लग्नाची चर्चा काही क्षणात गावात वणव्यासारखी पसरली. काही वेळातच गर्दी वाढली. लोक छत्रपाल आणि किन्नर बिल्लो राणीचे अभिनंदन करू लागले.
बिल्लो राणीनेही या लग्नात पूर्णपणे सहभाग घेत आनंदाने स्विकारले. यानंतर संध्याकाळी छत्रपालने सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते. यावेळी वरातीचेही नियोजन करण्यात आलं होतं यांच्या घरी मेजवानी होती, त्यात त्यांच्या नातेवाईकांशिवाय गावकरीही सहभागी झाले होते. डीजेच्या तालावरही सर्वांनी जोरदार डान्स केला.