आजकाल फोनशिवाय कोणीही राहू शकत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात सर्रास फोन पहायला मिळतील.
लहानपणी आणि मोठेपणीही असं सांगितलं जातं की, जास्त मोबाईल वापरल्यावर माणून आंधळं होतं. अजूनही या समजावर अनेकजण विश्वास ठेवतात.
मात्र खरंच मोबाईल जास्त वापरल्यास माणूस आंधळं होतं हा समज चुकीचा आहे.
या सगळ्या गोष्टी फोनचं व्यसन लागू नये म्हणून सांगितल्या जातात. तुम्ही फोन जास्त वेळ वापरत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही होतो यात शंका नाही.
जास्त वेळ मोबाईल वापरल्यास थकवा आणि तणाव वाढू लागतो.
मोबाईल जास्त वेळ वापरल्याने मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे तणावाची पातळी वाढते आणि थकवा जाणवू लागतो. मात्र अंधत्त्व येत नाही.