NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Pizza खाताय सावधान! किमान एकदा या लिंक क्लिकवर करून पाहा; नाहीतर पस्तावाल

Pizza खाताय सावधान! किमान एकदा या लिंक क्लिकवर करून पाहा; नाहीतर पस्तावाल

पिझ्झाचा बॉक्स उघडताच व्यक्तीला धक्का बसला. फोटो पाहून तुम्हीही हादराल.

16

पिझ्झा म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्हीही पिझ्झा आवडीने खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. पिझ्झा खात असाल तर सावधान व्हा. कारण पिझ्झाचे असे फोटो समोर आले आहेत, जे पाहूनच तुम्हाला उलटी येईल.

26

मुकेश गाडिया नावाच्या व्यक्तीने डॉमिनोमधून ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला. डिलीव्हरी मिळाल्यानंतर त्याने तो बॉक्स उघडला आणि त्याला धक्काच बसला.

36

मुकेश म्हणाला, पिझ्झा तर अनेक लोकल दुकानातही मिळतात. पण चांगल्या क्वालिटीचा म्हणून डॉमिनोजहून पिझ्झा मागवला. पण जसा बॉक्स उघडला तसा मला धक्काच बसला.

46

त्या पिझ्झाच्या बॉक्समध्ये कीडा होता. त्यानंतर एका स्लाइसमध्येही आणखी एक कीडा दिसला. जर मला बॉक्समध्ये किडा दिसला नसता तर मी पिझ्झाच्या आतही तपासून पाहिलं नसतं. तो पिझ्झा तसाच खाल्ला, असं तो म्हणाला.

56

झारखंडमधील गोड्डा शहरातील ही घटना. भागलपूर रोडवरील डॉमिनोज पिझ्झा आऊटलेटमधून हा पिझ्झा मागवला होता. तिथल्या मॅनेजरने सांगितलं, पिझ्झा 200 डिग्रीवर बेक होतो. जर यात किडा असता तर तो जिवंत राहिलाच नसता.

66

तर मुकेशने पिझ्झा कच्चा असल्याचंही म्हटलं आहे. प्रसिद्ध कंपनीकडून असं काही होईल, याचा मी विचारही केला नव्हता असं म्हणत त्याने अन्न विभागाकडे या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.

  • FIRST PUBLISHED :