आजकालची तरुणाईमध्ये दारु पिण्याचं क्रेझ पहायला मिळतं. मात्र असाही एक देश आहे जिथे दारु पिण्यास बंदी आहे. एवढंच नाही तर दारु विकणाऱ्यांनाही शिक्षा होते.
भारताच्या शेजारी देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये हा कायदा आहे. इथे दारूचे उत्पादन, विक्री, पिणे आणि वापरणे कायदेशीररित्या गुन्ह आहे.
जर तुम्ही अवैधरित्या हे करताना पकडला गेलात तर तुम्हाला फटके मिळतात, दंड भरावा लागतो, काही वेळात तर तुरुंगातही जावं लागतं.
तुमचं वय कितीही असो तरीही तुम्ही येथे दारु पिऊ शकत नाही.
दारूचे दुकान, नाईट क्लब किंवा बार तुम्हाला या ठिकाणी सापडणार नाहीत.