बऱ्याचदा काही कारणास्तव कपलला एकमेकांपासून दूर राहावं लागतं किंवा ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतात. या परिस्थितीत काही वेळा जोडीदाराला किस करण्याची, मिठी मारण्याची इच्छा होते. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
एकमेकांपासून दूर असल्याने एकमेकांना ऑनलाईन चॅटिंगमध्ये किसचा इमोजी पाठवणं किंवा व्हिडीओ कॉल सुरू असताना मोबाईलला किस करून एकमेकांना किस देणं इतकंच शक्य होतं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
पण आता तुम्ही मोबाईलवर दिलेली ही किस तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचू शकणार आहे. म्हणजे तुम्ही दोघंही दूर राहून एकमेकांना लिप टू लिप किस देऊ शकता. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
एक असं अनोखं किसिंग डिव्हाइस तयार करणयात आलं आहे, ज्यामुळे दूर राहूनही ओठांना स्पर्श करून किस केल्याचा अनुभव मिळेल. या डिव्हाइसचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार हे डिव्हाईस वापरण्यासाठी एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर डिव्हाइस मोबाईलच्या चार्जिंग पोर्टमध्ये प्लग करा. अॅपमार्फत पार्टनरसोबत जॉईन होऊ शकता. (फोटो सौजन्य - ट्विटर)
या किसिंग डिव्हाईसला ओठ आहेत, जे सिलिकॉनपासून बनवण्यात आले आहेत. त्यात सेन्सर बसवण्यात आले आहेत. हे डिव्हाइस कपलने आपापल्या मोबाईलला लावून तोंडात धरून किस केल्यानंतर डिव्हाईसवरील ओठांचीही हालचाल होते. (फोटो सौजन्य - ट्विटर)
हे किसिंग डिव्हाइस कपलला दूर राहूनही एकमेकांना रिअल किस केल्याची फिलिंग देतं, ओठांच्या दाबासह तापमानही अनुभवू शकता, असा दावा केला जातो आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)
आता हे डिव्हाईस कुठे मिळतं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल, हे डिव्हाईस चीनमध्ये बनवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)