जगातील सर्वात तरुण आणि सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेली जीना स्टीवर्ट एक मॉडेल आहे. तिला पाहिल्यानंतर अनेकजण तिचं वय ओळखू शकत नाहीत. फोटो पाहून ही मॉडेल 52 वर्षांची असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सोशल तिची खूप जास्त क्रेझ आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जीना मेन्स मॅगझिन प्लेबॉय आणि मॅक्सिमसाठी मॉडेलिंग करते. बहुतेकांना तिचं वय समजत नाही.
जीना स्टीवर्टने अलीकडेच खुलासा केला आहे की, वयाच्या 52 व्या वर्षीही तिचा एकही केस पांढरा झाला नाही आणि याचे कारण तिची लाईफस्टाईल आहे. तिला तिच्या पालकांकडून चांगले जीन्स मिळाले असून ती छान दिसते तरीही ती स्वतःकडे खूप लक्ष देते.
जीना दररोज ग्रीन टीचे सेवन करते आणि तिच्या मते, त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचा सुधारण्यास आणि तरुण ठेवण्यास मदत करतात. ती मेडिटेरियन डाएट करते. तिचं असं म्हणणं आहे की यामुळे वृद्धापकाळातील आजार तिच्यापासून दूर राहतात.
तुम्हाला तरुण राहायचे असेल तर तुम्ही फक्त तेच केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. यासाठी कधीही वयाची पर्वा करू नये. याशिवाय व्यायाम, खाणे-पिणे आणि तणावापासून दूर राहणे यांचाही यात वाटा असतो.