जगात अनेक निरनिराळ्या परंपरा, विधी आहेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या अनोख्या परंपरा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. भारतात असंही एक गाव आहे जिथे लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवावे लागतात.
ही अनोखी परंपरा छत्तीसगडच्या बस्तर भागात मुरिया जमातीत आहे. येथील लोक या परंपरेचं वर्षानुवर्षे पालन करत आलेले आहेत.
एकमेकांना समजून घेण्यासाठी मुलगा मुलगी लग्नापूर्वी एकत्र राहतात. चांगला वेळ सोबत घालवतात.
या अनोख्या परंपरेचा सन्मान आणि जतन करण्यासाठी समाजातील सदस्य एकमेकांना प्रोत्साहित करतात. या ठिकाणी मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त झाल्यावर त्याचे पालक त्याला घोटूळ येथे पाठवू लागतात. घोटूळ हे तरुण तरुणींना एकत्र वेळ घालवण्यासाठी बनवलेला राहण्याची जागा असते. तो घोटूलला जाऊन वाट्टेल ते करायला मोकळा आहे. तिथे तरुण-तरुणी लग्नाआधीही एकमेकांशी संबंध ठेवू शकतात.
येथे मुले आणि मुली कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय आपला जोडीदार निवडण्यास मोकळे आहेत. ते लग्नापर्यंत कितीही साथीदार बनवू शकतात.