मानवी शरीर कोणत्या यंत्रापेक्षा कमी नाही. हेच सिद्ध करणारे असे तुमच्या शरीराबाबतचे 10 फॅक्टस तुम्हाला माहिती झाले तर तुम्हााल आश्चर्यच वाटेल.
माणूस एका मिनिटात 20 वेळा, म्हणजे 1 वर्षात 10 दशलक्ष वेळा पापण्या मिचकावतो.
एका वयानंतर माणसाची उंची वाढणे थांबते पण नाक कान सतत वाढत राहतात.
नेक्टर स्लीप वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मानवी शरीरात इतकी चरबी असते की त्यापासून साबणाचे 7 बार बनवता येतील.
ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला तर मानवी मेंदू 3 ते 6 मिनिटं काम करू शकतो.
अंतराळात राहून अंतराळवीरांची लांबी 2 इंचांपर्यंत वाढू शकते.
माणसाच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्याच्या शरीरात सुमारे 300 हाडे असतात आणि जसजसा तो मोठा होतो तसतशी ती 206 होतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान समजले जाणारे लहान आतडे प्रत्यक्षात तुमच्या उंचीपेक्षा मोठे आहे. लहान आतडे 23 फूट लांब असते.
माणसाची उंची सकाळी जास्त असते आणि रात्रीच्या वेळी ती कमी होते. याचे कारण म्हणजे सकाळी स्नायू आणि पाठीचा कणा सरळ राहतो.
फिंगरप्रिंट्सप्रमाणे, मानवी जिभेवर विशिष्ट प्रकारचे प्रिंट्स असतात जे इतर सर्वांपेक्षा वेगळे असतात.
Nectar Sleep या वेबसाईटनुसार, एखाद्या व्यक्तीने एखादे गाणे ऐकले तर त्याच्या हृदयाचे ठोके त्या गाण्याच्या बीट्सशी सिंक होऊ शकतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)