लग्नाच्या अनेक परंपरा, विधी यांविषयी तुम्ही ऐकलं असेलच. मात्र कधी एका दिवसासाठी लग्न अशा परंपरेविषयी ऐकलंय का? नसेल याविषयी जाणून घेऊया.
जगात अशी एक जागा आहे, जिथे लग्न काही तासभरांसाठी केलं जातं. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र ही गोष्ट खरी आहे.
भारताच्या शेजारी देश चीनमधील काही भागात पुरुष केवळ 24 तासासाठी लग्न करतात.
चीनच्या हुबेई प्रांतात विशेषत: ग्रामीण भागात 24 तास म्हणजेच एका दिवसात लग्न करण्याचा ट्रेंड आहे.
इथे काही लोकांना गरिबीमुळे लग्न करता येत नाही म्हणून ते मरण्यापूर्वी फक्त नावापुरते लग्न करतात.
ज्या व्यक्तीने असं लग्न केलं त्यानं सांगितलं की त्याच्याकडे अनेक व्यावसायिक वधू आहेत, ज्या 40 हजार रुपये घेऊन लग्न करतात. या बहुतेक बाहेरून आलेल्या मुली आहेत आणि त्यांना पैशांची गरज आहे.
गरीब पुरुष लग्नानंतर वधूला त्यांच्या वडिलोपार्जित स्मशानभूमीत घेऊन जातात. तिथे ते पूर्वजांना सांगतात की ते विवाहित आहे.