NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / इथल्या लोकांचे म्हातारपणातही पांढरे होत नाहीत केस; एका क्लिकवर पाहा त्यांच्या काळ्या केसांचं सिक्रेट

इथल्या लोकांचे म्हातारपणातही पांढरे होत नाहीत केस; एका क्लिकवर पाहा त्यांच्या काळ्या केसांचं सिक्रेट

असं गाव जिथं सर्वांचे केस काळेभोर आहेत. वृद्धापकाळातही त्यांचे केस पांढरे होत नाही. कारण ते एका खास पद्धतीने केसांची काळजी घेतात.

16

काळेभोर केस कुणाला आवडत नाही. महिलाच नव्हे तर पुरुषांनाही काळे केस हवे असतात. पण वाढत्या वयानुसार केस पांढरे होतात. आता तर अगदी कमी वयातच केस पांढरे होऊ लागलेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल असं एक ठिकाण जिथं म्हाताऱ्यांचेही केस पांढरे होत नाहीत. (प्रतीकात्मक फोटो - Canva)

26

चीनच्या गुइलिनमधील हुआंग्लू याओ गावातील रेड आयो समाजाचे लोक. या समाजातील सर्व महिलांचे केस लांब आहेत. लांब केस दीर्घ आयुष्य, धन, समृद्धी, सौभाग्याचं प्रतीक मानतात. आयुष्यात वयाच्या अठराव्या वर्षी फक्त एकदाच त्या केस कापतात. (फोटो - गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)

36

या गावात या समाजाची दरवर्षी एक जत्रा भरते. जिथं या समजातील महिला लाल रंगाचे कपडे घालून नटूनथटून येतात. नदीकिनारी जमून पारंपारिक गीत गातात, सामूहिक नृत्य करतात आणि सर्व जणी मिळून एकाच वेळी एकमेकींचे केस विंचरतात. (फोटो - गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)

46

एकत्र येऊन केस विंचरण्याच्या त्यांच्या कित्येक वर्षांच्या परंपरेचा आता वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. गिनीज बुकमध्ये याची नोंद झाली आहे.  456 मीटर म्हणजे 1496 फूट लांब साखळी तयार करून या महिला एकमेकींच्या केस विंचरत होत्या. (फोटो - गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)

56

इथं एकाचेही केस पांढरे नाहीत, अगदी वृद्धांचेही. कारण ते खास पद्धतीने काळजी घेतात. ते शाम्पू वापरत नाहीत. पपनस फळाची साल, टी ऑईल ड्रेग्स आणि काही हर्ब्स फर्मेंट केलेल्या तांदळाच्या पाण्यात टाकून ते उकळतात. हे पाणी थंड करून या पाण्याने ते केस धुतात. (फोटो - गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड)

66

तांदळाच्या पाण्यात काही वेळ केस भिजवून ठेवतात. त्यानंतर धुतात आणि विंचरतात. यामुळे त्यांचे केस मुलायम, काळे, चमकदार असतात. त्यांना स्प्लिट एंड्सही नसतात. (प्रतीकात्मक फोटो)

  • FIRST PUBLISHED :