आतापर्यंत बरेच विचित्र विचित्र वर्ल्ड रेकॉर्डबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण कधी घोस्टच्या रेकॉर्डबाबत ऐकलं आहे का? असाच घोस्ट रेकॉर्ड चर्चेत आला आहे.
आता घोस्ट म्हटल्यावर तुमच्यासमोर भूत आलं असेल. पण खरंतर वर्ल्ड रेकॉर्ड करणारं हे घोस्ट भूत नव्हे तर एक गाय आहे. घोस्ट हे गायीचं नाव आहे.
नेब्रास्कारमधील मेगन रिमॅन नावाच्या महिलेकडे असलेली ही गाय. जिने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त करतब करून दाखवले आहेत.
रिमॅन म्हणाली की, जेव्हा घोस्टला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्यात काहीतरी खास असल्याचं समजलं आणि तिला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.
रिमॅन घोड्यांना ट्रिक ट्रेनिंग कोर्स शिकवायची. घोस्टलाही तिने याच टेक्निकने शिकवलं. लहानपणापासूनच तिने तिला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आणि घोस्टही लवकर शिकली.
घोस्टने एका मिनिटांत म्हणजे 60 सेकंदात 10 ट्रिक्स करून दाखवल्या आहेत. ज्यामुळे गिनीज बुकमध्ये तिची नोंद झाली आहे.
तिच्या या करतबमध्ये एका जागेवर राहणं, बोलवताच येणं, स्वतःच गोलगोल फिरणं, वाकणं, उड्या मारणं, एका आसनावर उभं राहणं, पाय उतलणं, घंटीला स्पर्श करणं, किस देणं आणि मान किंवा डोकं हलवणं याचा समावेश आहे. (सर्व फोटो - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)