पशू-पक्ष्यांना नैसर्गिक आपत्तीची माहिती आधीच मिळते का, यावर अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहे. तुर्कस्तानातील भूकंपाआधीही आकाशात पक्ष्यांचा थवा पाहायला मिळाला होता. त्यावेळी याला संकटाचे संकेत म्हटलं होतं.
आता जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्युट ऑफ अॅनिमल बिहेव्हिअरच्या बायोलॉजिस्ट मार्टिन विकेल्स्की यांनी बकऱ्यांना 4-5 तास आधी संकटाचे संकेत मिळतात, असा दावा केला आहे. त्यांच्या वागण्यात बदल होतो, असं ते म्हणाले.
डायचे वॅले्या रिपोर्टनुसार गेल्या दहा वर्षांत बकऱ्यांच्या व्यवहाराबाबत अभ्यास करणारे विकेल्स्की ज्वालामुखी विस्फोटाआधी बकऱ्यांची वागणूक पाहतात. ते म्हणाले, ज्वालामुखी विस्फोट कधी आणि कुठे होईल आपल्याला माहिती नाही. पण बकऱ्या याची योग्य माहिती देऊ शकतात.
स्थानिक लोकांच्या मते, जेव्हा ज्वालामुखीचा विस्फोट होतो तेव्हा बकऱ्या डोंगर सोडून आपल्या जवळ येतात. त्या डोंगरावर चरायला जात नाहीत. मार्टिनने याचा तपास करण्यासाठी 15000 बकऱ्यांवर ट्रान्समीटर लावले जेणेकरून त्यांना ट्रॅक करता येईल.
सामान्यपणे बकऱ्या डोंगर वेगाने चढतात. पण जर असं त्यांनी नाही केलं तर. शास्त्रज्ञांनी इथूनच अभ्यास सुरू केला. काही मोठे विस्फोट झाले तेव्हा बकऱ्या नेहमी खालीच राहिल्या. सामान्यपणे ते अशा करत नाहीत. जर्मनीमध्ये 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या काही ज्वालामुखी विस्फोटांची बकऱ्यांनी योग्य भविष्यवाणी केली होती. काहींनी तर 6 तास आधीच अलर्ट दिला होता.
बकऱ्यांवर रिअल टाइम सेन्सर लावण्यात आले. जशा त्या नर्व्हस होतात आणि त्यांचं वागणं बदलतं तसं शास्त्रज्ञ अलर्ट जारी करतात. मार्टिनच्या दाव्यानुसार बकऱ्यांना विस्फोटचा अंदाज 5-6 तासांआधीच होते. सिसलीत होणाऱ्या या प्रयोग लवकरच जगभर वापरला जाणार आहे.
फक्त बकऱ्याच नव्हे तर भटक्या कुत्र्यांच्या मदतीनेही अर्ली वॉर्निंद सिस्टम बनवण्याची तयारी होते आहे. मार्टिन म्हणाला, प्रत्येक ठिकाणी असे प्राणी असतात जे आपल्याला अलर्ट करू शकता. भूगर्भीय हालचालींची सूचना त्यांना सर्वात आधी मिळते. यामुळे आपण भूकंप, ज्वालामुखी विस्फोट अशा संकटाचा इशारा जगाला देऊ शकतो.