एक काळ असा होता की विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी स्वप्नासारखं होतं. पण आजच्या काळात ते खूप सोपं आणि किफायतशीर झालं आहे. काही हजार रुपयात विमान प्रवास करता येतो. अनेक वेळा चांगली सूटही मिळते, त्यामुळे थोडे पैसेही वाचतात.
पण प्रत्येक वेळी प्रवास करण्यासाठी स्वतंत्र विमान तिकीट आवश्यक आहे. असं असताना प्लेनचं असं तिकीट जे एकदा काढल्यावर त्याच तिकीटावर आयुष्यभर जगात कुठेही, कधीही आणि कितीही वेळा मोफत विमान प्रवास करता येतो, असं सांगितलं तर...
अमेरिकेतील एका व्यक्तीने असं तिकीट खरेदी केलं आहे. टॉम स्टुकर असं या व्यक्तीचं नाव. 69 वर्षांच्या टॉमने 32 वर्षांपूर्वी प्लेनचं एक तिकीट खरेदी केलं. त्यानंतर त्याने पुन्हा तिकीट काढलंच नाही. याच तिकीटावर तो मोफत प्रवास करतो आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टॉमने सांगिल्यानुसार त्याने आतापर्यंत सुमारे 23 दशलक्ष मैलांचा प्रवास फ्लाइटने केला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक देशांचा समावेश आहे. 300 हून अधिक वेळा तो ऑस्ट्रेलियाला गेला आहे. त्याने पत्नीला 120 हून अधिक वेळा हनिमूनला नेलं आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉमने 1990 मध्ये युनायटेड एअरलाइन्सचं तिकीट खरेदी केलं होतं, जो एअरलाइन्सचा लाइफटाइम पास होता. या तिकीटासाठी टॉमने तेव्हा 2 लाख 90 हजार डॉलर्स म्हणजेच आजच्या हिशेबाने सुमारे 2 कोटी 37 लाख रुपये खर्च केले होते.
त्यानंतर त्याला एअरलाइन्सच्या कोणत्याही फ्लाइटमध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी लाइफटाइम मोफत पास मिळाला. विशेष म्हणजे त्याला त्याच्या आवडीची जागाही देण्यात येते. तो त्याच्या आवडत्या सीटवर बसून कोणत्याही देशाचा प्रवास करतो. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)