पूर्वी एखादी व्यक्ती लग्नासाठी स्थळ घेऊन यायची. त्यानंतर वधू-वर सूचक मंडळं आली. आता तर मॅट्रीमोनिअल वेबसाईट उपलब्ध आहेत. असं असताना एका तरुणीने मात्र सोशल मीडियावरच आपल्यासाठी नवरा शोधण्याची ऑफर दिली आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारी ही 34 वर्षांची तरुणी जिचं नाव ईव्ह टिली-कॉल्सन आहे. ती वकील आहे. कित्येक वर्षांपासून आपल्यासाठी नवरा शोधते आहे. पण तिला हवा तसा मुलगा मिळाला नाही.
अखेर तिने आपल्या मित्रमैत्रिणींसह बॉसलाही आपल्यासाठी नवरा शोधायला सांगितलं. जो तिच्यासाठी नवरा शोधेल, त्याला 5 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 4 लाख रुपये देईल, असं तिनं सांगितलं. पण तेसुद्धा तिला हवा तसा नवरा शोधू शकले नाही.
अखेर तिने हीच ऑफर इतर लोकांना दिली. सोशल मीडिया टिकटॉकवर तिने ही पोस्ट केली. ज्यात तिने कुणी माझ्यासाठी नवरा शोधून दिला आणि मी त्याच्याशी लग्न केलं तर त्या व्यक्तीला 4 लाख रुपये देणार असं तिनं सांगितलं.
तिने आपल्याला नवरा नेमका कसा हवा तेसुद्धा सांगितलं आहे. तो 27 ते 40 वयोगटातील असावा. उंची कमीत कमी 6 फूट असावी. स्पोर्टची आवड हवी. चांगली बुद्धिमता असावी. चांगला संभाषक, मस्करी करणारा हवा. त्याला कोणतंच व्यसन नसावं, लांब प्रवास आवडायला हवा.
ईव्हीने आपण त्याच्यासोबत दीर्घकाळ राहणार नाही. 20 वर्षांत घटस्फोट घेईन, असंही सांगितलं आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार ईव्हीच्या या ऑफरला अनेकांनी प्रतिसाद दिला. पण अजूनपर्यंत ईव्हीला कुणीच पसंत आलं नाही. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)