आजच्या काळात योगासनं जगभरात खूप पसंत केलं जात आहे. यामुळे आरोग्य तर चांगलं राहतंच, पण मानसिक शांततेसाठीही हे ओळखलं जातं. म्हणूनच की काय आता हत्तीही योगा करू लागले.
या हत्तींच्या योगासनांचा त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीच्या वेळापत्रकात समावेश आहे. इथं येणाऱ्या लोकांना त्यांना योगा करताना पाहायला आवडतं. त्यांच्यासाठी ते आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.
प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या हत्तींच्या आरोग्यासाठी त्यांना योगासनं शिकवली जात आहेत. प्रत्येक हत्तीने दिवसातून 5 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. काही हत्तींना दिवसातून दोनदा योगासनं केली जातात.
जेव्हा हत्ती योगासने करतात तेव्हा त्यांना फळे किंवा ब्रेड देऊन त्यांचं कौतुक केलं जातं. हत्तीला योग करावासा वाटत नसेल तर तो तिथून निघून जातो. हत्तीला याची सक्ती नाही.
योगा करणारे हे हत्ती आहेत अमेरिकेच्या ह्युस्टन प्राणीसंग्रहालयात. हत्ती अशी योगासनं करतात की त्यांच्यासमोर माणूसही फेल वाटेल. (सर्व फोटो - ट्विटर)