उन्हाळा सुरु आहे आणि म्हणतात की गरमीमध्ये कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
उन्हाळ्यात कॉफी पिणं फायदेशीर की हानिकारक? याविषयी तज्ञांचं नेमकं काय मत आहे याविषयी जाणून घेऊया.
तज्ञांच्या मते कॉफीमध्ये कॅफिन असते, त्यामुळे वारंवार टॉयलेटला जावं लागतं. वारंवार शौचालयास गेल्याने शरीरातील पाणी कमी होतं.
कॉफीचं सेवन योग्य प्रमाणात केलं तर ते शरीरासाठी योग्य ठरु शकतं, असं तज्ञांचं मत आहे.
उन्हाळ्यात कॉफी पिणं योग्य आहे पण प्रमाणात.
यूएस फूड अॅंड अॅडमिनीस्ट्रेशननुसार, निरोगी व्यक्तीने दिवसात 400 मिलीपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये.
कॉफीचे अतिसेवन शरीराला हानी पोहचवू शकते.