NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / ऐकावं ते नवल! चक्क कुत्र्याने केला 'डिप्लोमा'; नेमकं काय शिकला तुम्हीच पाहा

ऐकावं ते नवल! चक्क कुत्र्याने केला 'डिप्लोमा'; नेमकं काय शिकला तुम्हीच पाहा

एका कुत्र्याने एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात डिप्लोमा केला आहे.

16

आतापर्यंत तुम्ही फक्त माणसांनाच पदवी किंवा डिप्लोमा घेताना पाहिले असेल. पण अमेरिकेत एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एका कुत्र्याला डिप्लोमा प्रदान करण्यात आला आहे.

26

डेली मेलच्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमध्ये लॅब्राडोर-गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या कुत्र्याला डिप्लोमा देण्यात आला आहे. जस्टिन असं या 6 वर्षांच्या कुत्र्याचं नाव आहे.

36

जस्टिनची शिक्षिका ग्रेस मारियानी यांनीही याच महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. त्यांना विद्यापीठाकडून विज्ञान शाखेची पदवी प्रदान करण्यात आली.

46

त्यांच्यासोबत त्यांच्या कुत्र्यालाही डिप्लोमा देण्यात आला, कारण हा कुत्रा सतत त्याच्यासोबत असायचा.

56

वास्तविक, मारियानी व्हीलचेअरवर फिरते, त्यामुळे जस्टिन तिच्या मदतीसाठी प्रत्येक क्षणी सावलीसारखा तिच्यासोबत असतो. तिच्यासोबत तो कॉलेजमध्येही असायचा. याचा अर्थ जस्टिननेही मारियानीप्रमाणे शिक्षण पूर्ण केलं. त्यामुळे त्याचाही गौरव करण्यात आला.

66

जस्टिनने आपल्या तोंडात डिप्लोमाचं सर्टिफिकेट पकडलं. तिथं जमलेल्या सर्वांनी त्याचासाठी टाळ्या वाजवल्या. मारियानीला कुत्र्यांची खूप आवड आहे. जस्टिनला पुढे शिकवण्याचा विचारही ती करत आहे. 

  • FIRST PUBLISHED :