निसर्ग आणि त्याचे विविध अविष्कार नेहमीच लोकांनी थक्क करत आलं आहे. यातील एक खास आणि रंगीबेरंगी अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य.
काळ्या आणि निळ्याभोर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य हा निसर्गाचा एक अविष्कारच आहे.
मात्र इंद्रधनुष्य आणि त्याचे 7 रंग याविषयी तुम्हाला काही खास गोष्टी माहितीयेत का? ते कसं तयार होतं आणि इंद्रधनुष्याच्या सात रंगांचं नेमकं काय गुपित आहे.
सूर्याची किरणे जेव्हा पावसाच्या थेंबावर पडतात तेव्हा त्याचे जे रिफ्लेक्शन पडतं त्यामधून विविध रंगाचं विक्षेपण होतं. यातूनच इंद्रधनुष्याचे सात रंग तयार होतात.
सूर्यकिरणे पावसाच्या थेंबावर पडली की 42 अंशाच्या कोनात परावर्तीत होतात.
पावसाळ्यात अधिक प्रमाणात इंद्रधनुष्य दिसतात. हे सप्तरंग कशाचे प्रतिक असतात याविषयी पाहुया.
लाल रंग उत्साह आणि उर्जाचं प्रतिक मानला जातो. केशरी रंग आनंद आणि यश दर्शवतो.
पिवळा रंग बुद्धिमत्ता, ज्ञान, आणि आत्मविश्वास दर्शवतो. हिरवा रंग हिरवेगारपण, दयाळूपणा, शांततेचा प्रतिक आहे.
निळा रंग सहनशक्ती आणि शक्तीचे प्रतिक आहे. जांभळा रंग लाल आणि निळ्या रंगाला मिळून बनला असून त्याला वांग्याच्या भाजीचे नाव देण्यात आल आहे.
पांढरा रंग निर्मळ मनाचे प्रतिक आहे. लहान मुलांना इंद्रधनुष्य पाहण्यात खूप मजा येते.