उंदरांची गणना जगातील सर्वात खोडकर प्राण्यांमध्ये केली जाते, जे घरात घुसले तर दिवसभर इकडे-तिकडे धिंगाणा घालत राहतात.
उंदीर धारदार दातांनी पलंग कापतात तर कधी नवीन कपड्यांचे तुकडे करतात. मात्र हे उंदीर किती काळ जगतात हे तुम्हाला माहितीये का?
असे मानले जाते की उंदीर दोन वर्षेही जगू शकत नाहीत. परंतु आजकाल एका अशा उंदराची चर्चा होत आहे, जो इतकी वर्षे जिवंत आहे की सगळेच थक्क झाले आहे.
कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयात 'पॅट' नावाचा उंदीर आहे, ज्याचे वय 9 वर्षांपेक्षा जास्त आहे.
आजपर्यंत एवढ्या वयापर्यंत एकही उंदीर जिवंत नाही, त्यामुळे या उंदराचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाऊ शकते.
सॅन डिएगो प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॅट नावाच्या या उंदराचा जन्म 12 जुलै 2013 रोजी प्राणीसंग्रहालयात झाला होता.
9 वर्ष 5 महिन्यांचा उंदीर पॅसिफिक पॉकेट माऊस प्रजातीचा आहे, जो उत्तर अमेरिकेतील उंदराची सर्वात लहान प्रजाती मानली जाते.
उंदीर हा जगातील त्या प्राण्यांपैकी एक आहे, ज्यांना प्रथम पृथ्वीवरून अंतराळात पाठवले गेले. याशिवाय उंदरांबद्दल आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते पाण्याशिवाय उंटापेक्षा जास्त काळ जगू शकतात.