आज आमलकी एकादशी असून सर्वत्र श्री विठ्ठलाचा गजर सुरु आहे.
होळीपूर्वी आमलकी एकादशीला विशेष महत्त्व असते.
पंढरपूरमध्ये आमलकी एकादशी निमित्ताने खास सजावटही पहायला मिळातेय.
आमलकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास द्राक्षांची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.
त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे द्राक्षवेलीचे स्वरूप प्राप्त झाले.
आमलकी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये द्राक्ष्यांची नेत्रदीपक आरास पुणे जिल्ह्यातील भाविक श्री बाबासाहेब शेंडे व सचिन आण्णा चव्हाण कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
श्री विठ्ठलाचे गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी द्राक्ष्यांची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल द्राक्षवेलीत उभा असल्याचा भास होतोय.
देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.